💗"तिचं जग" 💗
अशाच धडाकेबाज पोलीस कर्मचारी सिल्लोड ग्रामीण पोलीस चौकीत आहेत ज्यांनी वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी अंगावर वर्दी चढवली. ज्या वयात मुली फक्त शिक्षणाचे स्वप्न बघतात, आयुष्याच्या नवीन महाविद्यालयीन प्रवासाकडे वळतात, त्या वयात तेजस्विनी सुरवसे/ जोशी मॅडम देशकार्यासाठी सज्ज झाल्या.
अभिमान अशा या रणरागिणीचा...
जिने सत्यात उतरवला ध्यास आपुल्या आयुष्याचा...
पाहुयात तिचं जग...!
वर्दीतल्या देशसेविका सिल्लोड ग्रामीण पोलिसच्या बीट मदतनीस पोलिस अंमलदार तेजस्विनी जोशी मॅडम. आपल्या कामातून सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशन मध्ये छाप पाडत कायद्याचे रक्षण करणाऱ्या तेजस्विनी मॅडम या मुळच्या लातूरच्या. त्यांचे शालेय शिक्षण हे ज्ञानेश्वर विद्यालयातून तर दहावीनंतरचे शिक्षण हे त्यांनी शाहू महाविद्यालय लातूर येथुन पुर्ण केले. तेजस्विनी मॅडम लहान असतांना आपल्या वडीलांची वर्दी बघतांना त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक निर्माण होत असे. त्यांची समाजकार्याप्रती असणारी धडपड आणि वर्दीवरील प्रेम यातून ते नेहमी सांगायचे की आपण देशासाठी लढलं पाहिजे, देशासाठीच जगलं पाहिजे आणि देशासाठीच सर्वस्व अर्पण करायला पाहिजे. त्यांचे शब्द हे तेजस्विनी मॅडमच्या उरात खोलवर रुजले आणि वडीलांच्या वर्दीत त्या स्वत:ला बघायला लागल्या. मग हेच स्वप्न उराशी बाळगत तेजस्विनी मॅडमने शाळेच्या वयापासूनच वर्दीची तयारी करायला सुरुवात केली. वयाच्या १४ व्या वर्षीच त्यांनी कराटे प्रकारात ब्लॅक बेल्ट पुर्ण करत आपली शारीरिक क्षमता वाढवली. स्वत:ला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खडतर परिक्षेसाठी सक्षम करत आपली क्षमता सिध्द केली. आणि पहिल्या प्रयत्नातच संपादन करत वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी पोलीस भर्तीमध्ये रुजू झाल्या. हे यश त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटूंबासाठी डोळे दिपवणारं होतं. त्यानंतरचे नऊ महिने त्यांच्यासाठी आयुष्य बदलून टाकणारे ठरले जेव्हा पुढील ट्रेनिंगसाठी त्यांना नागपूरच्या पोलीस ट्रेनिंग सेंटर मध्ये जावे लागले. तिथे फक्त व्यक्तीला शारीरिकदृष्ट्या सक्षम करत नाही तर अनेक दिव्यातुन पार होत तुमची यशोशिखर गाठण्यासाठीची तयारी करुन घेतली जाते. हया नऊ महिन्यांच्या प्रवासात एक व्यक्ती म्हणून त्यांच्यात फार बदल झाले हे त्या आवर्जुन सांगतात .त्या काळात ती १८ वर्षाची तेजस्विनी ९ महिन्यांनंतर बाहेर पडत असताना एक जवाबदार कर्तव्यदक्ष महिला पोलीस कर्मचारी म्हणून बाहेर पडली.
सुरुवातीला त्या औरंगाबाद ग्रामीण मुख्यालय येथून वैजापूर पोलीस स्टेशन येथे रुजू झाल्या. त्यानंतर अजिंठा पोलीस स्टेशन आणि आता सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये रुजू आहेत. त्यांच्या आयुष्याचा एक नवा काळ त्यांच्यासमोर भरपूर कसोट्या घेवुन उभा ठाकला. घरातच वडील आणि काका पोलिस हेडकॉन्स्टेबल तर काकांचे दोन्हीही मुले त्यांची भावंड पोलिस ऑफिसर असल्यामुळे बऱ्यापैकी त्या त्याच वातावरणात वाढलेल्या असल्याने त्या लगेच तिथे रुळल्या. याच दरम्यान त्यांचा विवाह सध्याचे सिल्लोड ग्रामीणचे पोलीस स्टेशनचे बीट जमादार अनंत जोशी यांच्याशी पार पडला. दोघही पोलीस क्षेञात कार्यरत असल्याने मुळातच समाजसेवेचे बीज त्यांच्या घरात रुजलेले आहे. या क्षेञात तेजस्विनी जोशी यांना ११ वर्षे पुर्ण झाले असून सध्या त्या सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये आपलेच श्रीमान बीट जमादार जोशी सरांच्या मार्गदर्शनाखाली बीट मदतनीस म्हणून कार्यरत आहेत.
बीट मदतनीस हे काम खरच सोप्पं नाही. दिलेल्या गावात जावून कायदा आणि सुव्यवस्था राखणं अत्यंत गरजेचे होवून जाते. अशा वेळेस अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. हुंडाबळी, गुन्हेगारी,अंतर्गत वाद,चोरी,अशा अनेक प्रकरणांचा गांभिर्याने विचार करत गावात काम करावे लागते. अनेक महिला जेव्हा आपले प्रश्न घेवुन येतात तेव्हा एक महिला म्हणून त्या प्रसंगात तिला धीर द्यावा वाटतो पण कायदा हा सर्वांसाठी समान असतांना न्यायदेवतेच्या नजरेतून गुन्हा सिध्द होईपर्यंत समोरची व्यक्ती ही आरोपीच असते. अशावेळेस तेथील नागरिकांना पोलिसांवर विश्वास ठेवण्यासाठी त्यांचा विश्वास संपादन करणं खरच आवश्यक असतं. पण तेजस्विनी मॅडम या आपला बीट उत्तम प्रकारे सांभाळतात. त्यांचं कर्तव्य अत्यंत चोख रित्या पार पाडतात. म्हणूनच खेड्यातील महिलांच्या नजरेत त्या लेडी सिंगमच आहेत. एक महिला पोलीस अंमलदार होऊन घरची जवाबदारी सांभाळणं खरच अवघड असतं कारण पोलीसी क्षेञात कर्तव्य पार पाडतांना वेळेचं बंधन रहात नाही. जेव्हा फोन वाजला तेंव्हा कर्तव्यावर हजर होणं भाग असतं. एक आई म्हणून जेव्हा तेजस्विनी जोशी आपल्या कुटूंबाकडे बघतात तेव्हा त्यांना त्यांनी घडवलेल्या स्वावलंबी मुलांचा अभिमान वाटतो. पोलीस डिपार्टमेंट म्हटलं की काटेकोर शिस्त ही आलीच आणि हिच तेजस्विनी जोशींनी आपल्या दैनंदिन जीवनात अवलंबली. सुदैवाने त्यांचे श्रीमान हे याच क्षेत्रात कर्तव्यदक्ष असल्याने त्यांना आपल्या पत्नीबद्दल नक्कीच सहानूभुती आहे. दोघांनाही तेवढाच वेळ आपल्या कर्तव्यावर द्यावा लागतो तर घराची जवाबदारी ही दोघांचीच हवी अशा समजुतदार पाविञ्यातून ते आपल्या पत्नीला सर्वतोपरी मदत करतात.
एक पोलीस ऑफिसर म्हणून त्या आपल्या पदाला न्याय देतच आहेत पण मुलांकडेही लक्ष देत त्या आपला आईधर्म पाळतात. पोलीस क्षेञात काम करतांना मानसिक तणाव हा नक्कीच येत असतो. कारण पोलीस स्टेशन मध्ये महिला किंवा पुरुष असा भेदभाव नसुन पोलीस हे फक्त पोलीसच असतात. दोघांनाही सारखेच कामे दिली जातात. हे काम करत असतांना अनेक विचारांनी पोलीस ग्रासलेले असतात कारण तेही शेवटी मनुष्यच आहेत. जेव्हा सामान्य जनता गणेशोत्सव, दिवाळी, शिवजयंती असे सण साजरे करत असतात तेव्हा माञ पोलीस हे राञंदिवस सुरक्षारक्षक बनून आपले कर्तव्य बजावत असतात. त्या सणांच्या काळात कुटूंबाचा न मिळणारा सहवास त्यांना नक्कीच आतून पोखरत असतो. ही वास्तव परिस्थिती आहे तर सहाजिकच आहे ताण येणं. पण याही परिस्थितीत तेजस्विनी जोशी मन खंबीर करुन समाजाच्या आनंदात आपला सण साजरा करत कर्तव्य पार पाडत असतात. याच कार्याची दखल म्हणून तेजस्विनी जोशी आजपर्यंत अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरल्या आहेत. त्यांच्या रोखठोक कामामुळे नेहमीच त्या चर्चेत असतात.
प्रत्येक महिला ही अनेक गुणांनी सुप्त असते. काळाच्या ओघात माञ तिचे ते गुण कुठेतरी दबले जातात. माञ तेजस्विनी जोशी या वाक्याला पुर्णपणे अपवाद ठरतात. अत्यावश्यक सेवेत कर्तव्य पार पाडतांना आपल्या छंदांचं ही संगोपण करणं ही खरच सोपी गोष्ट नव्हे. तेजस्विनी जोशी या उत्तम नृत्यांगणा आणि गोड गळ्याच्या गायिका आहेत. या प्रचंड धकाधकीच्या जीवनात त्यांनी त्यांचे हे छंद अगदी चोखंदळपणे जपले आहेत याबद्दल त्या खरच कौतुकास पाञ ठरतात. पोलीस ऑफिसर म्हटलं की लोकांच्या मनात धाक असतो की हे कशा पध्दतीने आपल्या समस्या सोडवतील माञ तेजस्विनी जोशींच्या बोलक्या आणि स्वच्छंदी स्वभावातुन त्यांनी जनतेच्या मनात स्वतः चं घर निर्माण करत विश्वास संपादन केला. त्यामुळे त्यांना बीट दिलेल्या गावात त्या रुजू झाल्यापासून कायदा आणि सुव्यवस्थेचे काटेकोरपणे पालन होतांना दिसते. महिलांचे प्रश्न त्यांच्यात बसुन तेजस्विनी जोशी समजून घेत त्यांना स्वसंरक्षणाचे धडे त्या नेहमीच देत असतात. या जगात वावरत असतांना बऱ्याच महिलांवर अतिप्रसंग ओढावतात , भरपुर समस्यांना त्या सामोऱ्या जात असतात तर अशा वेळेस त्या सगळ्या महिला वर्गाला आवाहन करतात की महिला पोलीस या सदैव तुमच्या मदतीसाठी तत्पर आहेत. महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दामिनी पथक २४ तास कार्यरत असते तर तुम्ही न घाबरता प्रवास करा आपली स्वप्न पुर्ण करा. मनात कुठलाही न्युनगंड न बाळगता, भिती न बाळगता त्वरित महिला पोलिसांशी संपर्क साधा. तेजस्विनी मॅडमनी आतापर्यंत अशा अनेक केसेसद्वारे महिलांना आधार देत परत नव्याने उभे केले आहे. तेजस्विनी जोशी यांचे वर्दीतले स्वप्न पुर्ण झाल्यानंतर त्या अविरतपणे आपली देशसेवेची मशाल रोज आपल्या कार्यातून उजळवत आहेत. कधीही फळाची अपेक्षा न करता त्या या समाजकार्यात झोकुन देवून काम करत आहे. पण नक्कीच जर आपल्या कार्याची कोणी दखल घेत पाठीवर कौतुकाची थाप पडली तर आपल्यात अजून दांडगा उत्साह संचारतो आणि आपण आपले काम अजून चांगले करण्यासाठी धडपडत असतो. तशीच थाप नुकतीच त्यांच्या पाठीवर एका सेवाभावी संस्थेने दिलेल्या पुरस्काराने पडली. सपत्निक पुरस्कार स्वीकारणं हा त्यांच्या साठी खरच सोनेरी क्षण घडला. ही सुखद घटना त्यांनी आपल्या मनात बंदिस्त करुन घेतली. कायद्याच्या मंदिरात पोलीस ऑफिसर म्हणून महिला कर्मचाऱ्यांना समान वागणूक दिली जाते. त्यामुळे प्रत्येकालाच आपल्या कामात प्रगती करण्यासाठी वाव मिळत असतो. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ऑफिसर आपला विकास साधत असतात. एकरुप होवून काम करणे, प्रसंगावधान राखून निर्णय घेणे अशा अनेक गुणानुक्रमामुळे तेजस्विनी जोशी सगळ्यांमध्ये वेगळ्या भासतात.
एक स्ञी म्हणून या क्षेञात येणाऱ्या महिलांसाठी संदेश देतांना तेजस्विनी मॅडम सांगतात की, जेव्हा ती खाकी वर्दी अंगावर चढते त्या क्षणापासून स्ञी आणि पुरुष हा भेदभाव तिथे पुरला जातो आणि समाजाच्या नजरेत तुम्ही फक्त खाकीतले तारणहार असतात. एक वेगळीच ऊर्जा त्या रंगातून आपल्यात संचारते आणि खाकीतले सौंदर्य आपलं रूप खुलवते. आता स्पर्धा प्रचंड वाढली असली तरी मेहनतीतून कोणतेही शिखर सहज सर करता येते. मुलगी आहे म्हणून मागे न हटता पोलीस ऑफिसर होण्याचे स्वप्न बघणारी नारीशक्ती म्हणून दहा पाऊलं पुढं टाका आणि आपल्या स्वप्नाला गवसणी घाला. हे आकाश तुमचंच आहे; तुमच्याच कर्तृत्वाचा इंद्रधनुष्य त्यात रेखाटा. नक्कीच! तो अनुभव शब्दबद्ध करण्यापलीकडचा असेल. एक दिव्यत्व प्राप्त करुन देणारा!
पोलीस क्षेञ हे खरच समुद्रासारखं अनिश्चित, अनाकलनीय आहे आणि याच समुद्रात बुट मदतनीस तेजस्विनी जोशी आपली विशेष छाप पाडत समाजकार्य करत आहेत. त्यांच्यासारख्या कडक, प्रामाणिक पोलिस ऑफिसरची महाराष्ट्र पोलिसांत गरज आहे.
अंखड परिश्रमाच्या जोरावर तेजस्विनी जोशींनी बीट मदतनीस पदापर्यंत गवसणी घातली आणि येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला तोंड देत त्या कायदा व सुव्यवस्था टिकवून आहेत. याबद्दल त्याचं करावं तेवढं कौतुक कमीच! तेजस्विनी मॅडमची देशसेवेच्या होमकुंडात उत्तरोत्तर प्रगती होवो आणि त्यांना चांगल्याप्रकारे आरोग्य लाभो हीच माझी सदिच्छा. मॅडम तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आणि सलाम...!
🖋️ प्राची नाईक उंडणगावकर 🖋️
Very nice👍
उत्तर द्याहटवाVery effective writing
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद
उत्तर द्याहटवाVery nice
उत्तर द्याहटवामहत्त्वपुर्ण आणि खुप छान मांडल आहे.
उत्तर द्याहटवाVery Nice Mam 👍👍 Keep it up our dashing and brave mam 👍👍
उत्तर द्याहटवाSalam tuzya lekhanila ani khaki premala
उत्तर द्याहटवाWe are proud of u mam.Really great work mam.keep it up mam.Best wishes for ur bright future
उत्तर द्याहटवाKhup chaan Prachi an ma'am salute to u
उत्तर द्याहटवाWe are proud of you ma'am really great work.Best wishes for ur bright future
उत्तर द्याहटवाGreat achievement of the police women salute to mam &awesome tonight prachi
उत्तर द्याहटवाVery nice mam. Keep it up.
उत्तर द्याहटवाVery nice man. Keep it up
उत्तर द्याहटवाProud of you didi.keep it up. Keep going.
उत्तर द्याहटवाNice tai
उत्तर द्याहटवाKhup ch chan
उत्तर द्याहटवाNice Mam
उत्तर द्याहटवाखुप छान
उत्तर द्याहटवाखूप छान,प्राची.
उत्तर द्याहटवाNice didi
उत्तर द्याहटवाNice tai
उत्तर द्याहटवाआम्हाला आपला सार्थ अभिमान आहे एवढ्या ही धाक धुकीच्या जीवनात वारकरी सांमप्रदायाची पताका फडकवत ठेवता जय हिंद जय भारत
उत्तर द्याहटवा