मिञ...
कुणी त्याला दोस्त म्हणतं, कुणी यार म्हणतं, तर कुणी 'ए भिडू' असं म्हणत खांद्यावर हात ठेवतो. आपल्या आनंदात आणि दु:खातही आपल़्या पाठीशी खंबारपणे उभा असतो तो मिञच...
मैञी म्हणजे माणसाने कुटूंबापलिकडे बनविलेलं पहिलं आणि एकमेव नातं. आज ''रंग मैञीचे '' या माझ्या लेखाच्या माध्यमातून मी विशेषकरून मुलींचे मैञीपलिकडचे नाते आणि मैञीचे रंग उलगडणार आहे. कारण सर्वच असं म्हणतात की, मुलींची मैञी काय शाळेच्या उंबरठ्यापर्यंत किंवा जास्तीत जास्त कॉलेजच्या गेट पर्यंत,नंतर काय एक तर लग्न होऊन जाते किंवा जबाबदारी मध्ये त्या अडकून जातात म्हणून ती मैञी कुठेतरी मागे पडते. ते थोड्या प्रमाणात खरेही, पण आता काळ बदललाय, तशी मैञीची परिभाषा देखील बदलत चाललीय कारण लांब असलो, तरी सोशल मिडियाच्या माध्यमातून आम्ही कनेक्ट असतो. आणि यामुळेच एकमेकींना भेटण्याची धडपड कायम असते. खरच मैञीसारखं सुंदर नातं आणि वेगळेपण या जगात कुठेच नाही आणि हेच मी अनुभवतेय.
मैञी ना समजवायची असते, ना गाजवायची असते, ती तर रूजवायची असते, मैञीत ना जीव घ्यायचा असतो, ना द्यायचा असतो, इथे जीव लावायचा असतो. ही एक प्रामाणिक व तरल संकल्पना आहे . जिथं आपलं नातं व्यक्त करायला पुर्ण स्वातंञ्य मिळतं,तिच खरी मैञी..!आपल्या आयुष्यात खुप मुली असतात, पण प्रत्येकच मुलगी ही आपली मैञीण नाही न होत. हीच तर खरी गंम्मत आहे. खऱ्या मैञिणी ओळखणं ही साधी गोष्ट नव्हे, पण एक माञ नक्की ज्यांना मैञीची गोडी चाखायला मिळते न ते खुपच नशीबवान असतात.
मुलींच्या बाबतीत असं बऱ्याचदा होत असतं की, प्रत्येकच गोष्ट त्या आपल्या जवळच्या व्यक्तीला नाही सांगू शकत, कारण मनात एक भिती असते कि, ते आपल्याला समजून घेतील का? तेव्हा ती गोष्ट मैञीणींना सांगते कारण तिला माहित असते,मैञी हे एक असं अढळ स्थान आहे जिथे तिला समजून घेतलं जाईल आणि मैञीसुध्दा निस्वार्थ असावी बरं का! कारण मैञीण जर चुकत असेल किंवा चुकीच्या वळणावर असेल तर तिला वेळीच सावध करणं हे खऱ्या मैञिणीचं कर्तव्य आहे.
मुलींनो मैञी फक्त कॉलेजच्या उंबरठ्यापर्यंत मर्यादित ठेवू नका, तर त्या मैञीच्या सप्तरंगात न्हावुन निघा, तरच तुम्हाला खऱ्या मैञीची ताकद अनुभवायला मिळेल. जेव्हा मैञीण कॉलेजला येत नाही तर आपसूकच तिची कमी भासायला लागते. तिची आठवण येते, खुप काही सुटल्यासारखं वाटतं, कशातच मन लागत नाही हीच मैञीची भावना आहे. मैञी हे एक असं नातं आहे ,ज्याला कुठलही बंधन नाही, वेळ कशीही येवो, ती आपल्यासाठी हजर असते. एकच शब्द बोलते 'मी आहे ना'! तू कशाला काळजी करतेस. या एका ओळीत सर्व काही सामावलेलं असतं.
मैञीविषयी लिहायला गेलं तर वेळ ,शब्द ,सर्वकाही कमी पडेन. "मैञीत एवढे काय विशेष असते ,तर मैञिणी या फक्त मैञीणीच असतात, त्या सख्या, चुलत,मावस अश्या काही नसतात, त्या डायरेक्ट मैञिणी असतात."
इंटरनेटवर बघितलं तर खुप काही लिहायला उपलब्ध असतं पण खऱ्या मैञीचं विश्लेषण करायला लागते ती अनुभवाची सांगड. आणि मी अभिमानाने सांगू शकते, कि मैञीची ती जादू मी अनुभवतेय, ती जगण्याची संधी मला मिळतेय आणि ती जीवापाड मैञी माझ्याकडे आहे. मला जीवाला जीव देणाऱ्या मैञीणी मिळाल्याय. मी खरच जर या माझ्या 'रंग मैञीचे 'या लेखात त्यांचा उल्लेख नाही केला तर तो अपुर्णच राहील, त्याला ते रूपत येणार नाही जे मसा हवे आहे.
मी मैञीची चव अगदी बालवाडीपासून चाखतेय,आम्ही कधी भांडतो, कधी रागावतो, तर कधी एकमेकींची मजा घेत खळखळून हसतोसुध्दा. जस-जसे वर्षे वाढत गेले तस तशी आमची मैञीही घट्ट होत गेली, त्या शाळेतील प्रत्येक कोपऱ्यात आमच्या मैञीचा सुगंध दरवळतोय. आमचा सात जणींचा ग्रुप.तिथे आम्ही आमची मैञी जन्मभर टिकवून ठेवण्याचा निश्चय केलाय कारण आमचं आसुष्य एकमेकींशिवाय पुर्ण होऊच शकत नाही. आणि शाळेपासुन ते आतापर्यंत ती मैञीची डोर घट्टच होत गेलीय.
मी नशीबवान आहे, की माझ्या आयुष्याचा सर्वात महत्वाचा भाग माझ्या मैञीणी आहेत, माझ्या प्रत्येक निर्णयात त्या असतात. मुळात आमच्या मैञीची ताकद हा आमच्यातील विश्वास आहे न तशीच एक अजुन मोठी ताकद ज्यानी आमची मैञी एवढी घट्ट आहे. कारण ती आमच्या कुटूंबाने समजुन घेतलीय. खरच माझ्या 'सेव्हन स्टार' माझ्या आयुष्यात नसत्या तर मी अशी मुळीच नसते. त्यांनी मला खुप काही शिकवलय, आयुष्य कसं जगावं याचं उत्तम उदाहरण त्या आहेत.मुख्य म्हणजे कोणीच कोणाला मागे खेचत नाही त्यामुळे प्रत्येकीचा गुण आत्मसात करण्याची संधी आम्हाला मिळाली. धन्यवाद! हा शब्द खुप छोटा आहे. मी रोज देवाला या एका गोष्टीसाठी धन्यवाद करते. आज मैञी दिन त्याबद्दल माझ्या लाडक्या सेव्हन स्टारसाठी मी बोलायलाच हवे...!
तुम्ही माझ्यासाठी फक्त माझ्या मैञीणीच नाही तर प्रत्येक नात्याचा जिव्हाळा मला तुमच्यातुन मिळतो,प्रेम, आपुलकी, मैञी, भाव, विश्वास आणि या पृथ्वीवरील सर्वच आश्चर्य आणि पंचमहाभुतांचा संगम आहात तुम्ही, माझ्यासाठी आपली मैञी हे नातं म्हणजे माझं कुटूंबच आहे... मी कधीच तुम्हाला त्यापेक्षा वेगळं समजली नाही आणि समजणारही नाही... जीव आहात तुम्ही माझ्या.... मी सतत तुमच्यासाठी हजर असणार आहे, ही गाठ सर्वांनी पक्की बांधुन ठेवा...सेव्हन स्टारचे 7रंग नेहमी उजळच रहाणार.आपल्या मैञीचा इंद्रधनुष्य सदैव रंगीतच रहाणार..! तर मैञिणींनो,माझ्या चांदण्याऩो...आपला मैञी दिवस तर रोजच असतो पण आज जरा महत्व आहेच तर HAPPIEST FRIENDSHIPDAY MY STARS MY FAMILY.... U GUYS ARE MY BREATH, MY SUNSHINE.. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील सोनेरी पान म्हणजेच आपली मैञी, 7स्टार या नावालाच माझा सलाम...आता आपल्या आयुष्याला एक नवीनच वळण मिळणार आहे पण मला विश्वास आहे की तिथेही आपली मैञी टिकणार....
पावसाच्या रागात एक सुंदर दिवसाची चाहुल लागली....आनंदाच्या वर्षावाने ही पृथ्वीही सुंदर न्हाली.. प्रेम, मैञीची साक्ष देणारा हा पाऊस स्पर्शुन मला म्हणाला.. नवी नाती, नवी स्वप्न आता एक नवीन पर्व... आयुष्याच्या या पर्वाला कडकडुन मिठी मार... बघ या पावसाच्या वर्षावात मागचाच राग परत येईल.. जुन्या सरींच्या सहवासाने नव्या इंद्रधनुलाही रंग चढतील...
प्रत्येक मुलीला अशी एक तरी हक्काची मैञीण मिळावी जन्मभरासाठी,तिच्यासोबत की एक वेगळ्या धाटणीचं आयुष्य जगू शकेल आणि उद्याच्या जगाचे स्वप्न पाहू शकेल. असेच माझ्यासारखेच तुम्हीही तुमच्या आयुष्यात मैञीचे रंग भरा आणि तिता वेल बहरू द्या. प्रत्येक नातं जपा पण मैञीला जरा जास्त जपा, आयुष्य खुप सुंदर होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा